चंद्रपुर

जिल्ह्यात एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही, ३ मे पर्यंत लॉकडाऊन कायमच

चंद्रपूर (का.प्र.) राज्यात ३ मे पर्यंत लॉकडाऊन कायम आहे. राज्याबाहेर व जिल्ह्याबाहेर असणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश देताना काळजीपूर्वक कार्यवाही केली जाणार आहे. मात्र या काळामध्ये मोठ्या प्रमाणात शारीरिक अंतर राखण्याचे आवाहन जनतेपुढे असेल. त्यामुळे घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. राज्य शासनाच्या सुधारित नियमानुसार अन्य राज्यात अडकून पडलेले तसेच मुंबई-पुणे व अन्य ठिकाणी अडकून पडलेल्या सर्व नागरिकांना परतण्यासाठी व्यवस्था केली जात आहे.

याबाबतच्या अधिकृत सूचना वेळोवेळी जारी केल्या जाणार आहेत . मात्र ही प्रक्रिया होताना कोरोना मुक्त असलेल्या जिल्हयामध्ये येणाèया प्रत्येकाची तपासणी केली जाणार (पान ५ वर)आहे. जिल्ह्यात ३० एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून ११२ नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील १०४ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ९३ नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर ११ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या ३४ हजार २ आहे. यापैकी २ हजार ४७७नागरिक निगराणीखाली आहेत. तर १४ दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या ३१ हजार ५२५ आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या १५७ आहे.अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिली आहे.

नियमांचे पालन न करणाèया नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील ३०२ प्रकरणात एकूण १६ लाख ६ हजार ५७० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे पालन न करणारया ५८ नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर १०४६ वाहने जप्त केली आहेत.प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम व सुचनांचे उल्लंघन करणाèयांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी कम्युनिटी किचन, जेवणाची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छता व सामान्य चौकशीसाठी महानगरपालिकेच्या ०७१७२-२५४६१४ या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार,अडचणी माहिती इत्यादींसाठी ०७१७२-२५३२७५, ०७१७२- २६१२२६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अ‍ॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या ०७१७२-२७०६६९ या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता व सामान्य चौकशीसाठी ०७१७२-२५१५९७, तसेच टोल फ्री क्रमांक १०७७ यावरसुध्दा चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणा?्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या ०७१७२-२७२५५५ या क्रमांकावर संपर्क करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा १५५- ३९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्टिड्ढक कोरोना कंटड्ढोल सेल हे फेसबुक पेज ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.