चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते परसोडा येथे विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण.

कोरपना — कोरपना तालुक्यातील मौजा परसोडा येथील नागरिकांच्या मागण्यांची दखल घेऊन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी येथे जल जीवन मिशन अंतर्गत २ कोटी रुपये निधीच्या नविन पाणी पुरवठा योजनांतर्गत ग्रामपंचायत परसोडा, परसोडा गुडा, रायपूर, कोठोडा खुर्द येथे नवीन पाण्याची टाकी निर्मीती कामाचे भूमिपूजन आणि खनिज विकास निधी अंतर्गत येथे तयार करण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
         या प्रसंगी जेष्ठ काँग्रेस नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे, कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे,  माजी जि. प. सदस्य कल्पणाताई पेचे, परसोडा चे सरपंच गिरजाताई कोहचाडे, उपसरपंच सतीश गोन्लावार, सतीश काटकार, गणेश मडावी, सुरेखा दुर्लावार, ज्योती तलांडे, पद्मा सिडाम, सुमित्रा कुंठावार, रविना मडावी, बंडू कन्नाके, तमुस अध्यक्ष नेमचंद्र काटकर, मारोती गोडनवार, इसरी गुज्जेवार यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *