चंद्रपुर

जिल्हा सामान्य रूग्णालयात लावले अद्यावत निर्जंतुकीकरण यंत्र

चंद्रपूर (का.प्र.)देशात कोरोनाने थैमान माजवले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा ठरतोय. विशेष करून रूग्णालयात काम करणारे डॉक्टर आणि कर्मचारी यांना याचा सर्वात मोठा धोका आहे. यापासून सुरूक्षा करण्यासाठी काही उपाय करण्यात येते. मात्र चंद्रपुरात डॉक्टर पालीवाल यांच्या नेतृत्वात काम करणाèया टिमने एक अद्यायवत यंत्र तयार केले आहे. स्वयंचलीत तंत्रज्ञानावर आधारित हे यंत्र त्यातून जाणाèया व्यक्तीला तीन थरात निर्जंतुक करते. त्यामुळे या यंत्रातून जाणारा व्यक्ती हा संपूर्णतः निर्जंतूक होतो. विशेष म्हणजे अशा प्रकारचे यंत्र देशात पहिल्यांदाच तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.

हे यंत्र आज जिल्हा सामान्य रूग्णालयात लावण्यात आलेअसून जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी पाहणी केली. जिल्हा रूग्णालयात प्रत्येक व्यक्ती हा पूर्णपणे निर्जंतूक केला जावा या उद्देशाने डॉ. पालीवाल यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या सोबत मेकॅनिकल इंजिनिअरींगचे ज्ञान असलेले संतोष जाधव, सागर शिगोडे, अतुल पाहाडे यांनी मोठी मदत केली. अनेक प्रयोग केल्यानंतरत्यांनी तीन थराचे मोठे निर्जतुकीकरण करणारे यंत्र तयार केले.त्याच्या पहिल्या थरात अतिनिल किरणे बाहेर पडतात ज्यामुळे पृष्ठ भागावर असलेले सर्व जंतू मरून जातात.

दुसèया थरात गरम हवेचा मारा होतो, तर तिसèया थरात सॅनिटाइझरचा फवारा उडतो. त्यामुळे बाहेर जाणारा व्यक्ती पूर्णपणे निर्जंतुक होतो. एकाच वेळी तिन्ही थरात निर्जंतूक करणारे हे पहिलेच यंत्र असल्याचा दावा निर्मात्यांकडून करण्यात आला. हे यंत्र पाहण्यासाठी डॉ. कुणाल खेमणार यांनी भेट दिली. ते स्वतः डॉक्टर असल्याने या यंत्रातील सर्व तांत्रिक बाबी जाणून घेतल्या. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर कोरोनाचे संकट रोखण्यासाठी देशाला मोठी मदत होईल यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.