चंद्रपुर

जनधन खातेधारकांचे पैसे सेतू केंद्रातून द्या-आ.किशोर जोरगेवार

चंद्रपूर (का.प्र.)कोरोना विषाणूमूळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत अनेक गरजूंच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना मदत म्हणून जनधन खातेधारकांसह निराधार महिलांना शासनाकडून आर्थिक मदत पाठविली जात आहे. मात्र, ही मदत बँकेच्या माध्यमातून देण्यात येते. सध्या बँकांमध्ये मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे येथे सामूहिक अंतर पाळल्या जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच लाभाथ्र्यांना पैसे काढताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता जनधनखातेधारकांसह निराधार योजनेचे पैसे सेतू केंद्राच्या माध्यमातून वाटप करण्यात यावे, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. संचारबंदीत चंद्रपूरकरांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे. परिणामी ही संचारबंदी यशस्वी होताना दिसत आहे. सध्या चंद्रपूरात एकही कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेला नाही.

ही समाधानकारक बाब असली तरी पुढील काही दिवस चंद्रपूरकरांना सावधगिरी बाळगायची आहे. या संचारबंदीचे काटेकोर पालन करत असताना अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता जनधन खातेधारकांसह निराधार महिलांना प्रशासनाच्या वतीने आर्थिक मदत पोहोचवली जात आहे. ही मदत थेट खात्यात जमा होत असून बँकेच्या माध्यमातून दिल्या जात आहे. मात्र, सध्या बँकेत लाभाथ्र्यांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे येथे कोरोना विरोधातील सारेच नियम तुटताना दिसत आहे. तसेच बँकांकडेही पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे लाभाथ्र्यांची गैरसोय लक्षात घेता सेतू केंद्राच्या माध्यमातून देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *