मुलगी गंभीर असून अति दक्षता विभागात उपचार सुरू….
शहरालगतच्या ग्रामीण भागात जुनोना गावात दुपारी 1,30 च्या सुमारास पंचफुला सिडाम या महिला सोबत 5 वर्षीय प्राजक्ता मेश्राम शेतशिवारातून परत येताना एका बिबट्याने प्रजक्तावर जीव घेणा हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. महिलेने आरडाओरडा केल्यावर बिबट्याने तेथून पळ काढला. गंभीर मुलीला ताबडतोब चंद्रपूर येथे सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तिच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरू आहे. तिचे वडील संदीप मेश्राम यांनी बल्लारशाह पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवली आहे.


