गडचिरोली

गडचिरोली जिल्हयात एका मृत्यूसह आज 31 नवीन कोरोना बाधित

*तर आज 49 जण कोरोनामुक्त
*गडचिरोली,(जिमाका)दि.18*: आज जिल्हयात 31 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 49 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8736 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8277 वर पोहचली. तसेच सद्या 363 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 96 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. एक नवीन मृत्यूमध्ये तालुका आरमोरी रा. शिवनी येथील 42 वर्षीय पुरुषाचा समावेश असून सदर व्यक्ती मधुमेहाने आणि एचटीएनने पिडीत होती. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.75 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 4.16 टक्के तर मृत्यू दर 1.10 टक्के झाला.नवीन 31 बाधितांमध्ये गडचिरोली 10, अहेरी 2, आरमोरी 0, भामरागड 1, चामोर्शी 4, धानोरा 3, एटापल्ली 6, कोरची 1, कुरखेडा 0, मुलचेरा 0, सिरोंचा 1 व वडसा येथील 3 जणांचा समावेश आहे.आज कोरोनामुक्त झालेल्या 49 रूग्णांमध्ये गडचिरोली 18, अहेरी 12, आरमोरी 3, भामरागड 1, चामोर्शी 2, धानोरा 5, एटापल्ली 1, मुलचेरा 1, सिरोंचा 1, कोरची 0, कुरखेडा 3 व वडसा मधील 2 जणाचा समावेश आहे.नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील नवेगाव 4, चणकाईनगर 1, देशपुर 1, रेड्डी गोडाऊन 1, सर्वोदय वार्ड 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, आलापल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये धोडराज पीएस 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये मुरमुरी 1, वायगाव 1, गणपुर 2, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये चातगाव 1, सोडे आश्रमशाळा 2, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये पोलीस मदत केंद्र, जांभीयागट्टा 1, करेम 1, एसआरपीएफ बुर्गी 3, पोलीस स्टेशन बुर्गी 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये भिमपुर 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये सोमनपल्ली 1, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये आतुरभाई मोवानी शाळेजवळ 1, कोरेगाव 2, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 2 जणांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *