चंद्रपूर,दि. 16 डिसेबर : कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने 12 व 13 डिसेबर,2020 रोजी पंडीत दीनदययाल उपाध्याय ऑनलाईन राज्यस्तरीय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्याला उद्योजक व उमेदवारांचा प्रतिसाद लक्षात घेता आता 20 डिसेबर 2020 पर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.ईच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर स्वत:ची नांव नोंदणी करुन किंवा ज्यांनी यापूर्वी नांवनोंदणी केलेली असेल असे सर्व उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉग इन करुन 20 डिसेबर,2020 रोजी पर्यत वेबपोर्टलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरिता उद्योजकांनी नमुद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करावा.तसेच उद्योजकांसोबत व्हाट्सअप,गुगल मिट व्हिडीओ कॉलींग ईत्यादी च्या माध्यमातून संपर्क साधून ऑनलाईन मुलाखत द्यावी व ऑनलाईन राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांनी केले आहे.
Related Articles
जिल्ह्यात दुपारपर्यंत १७ नवे रुग्ण
चंद्रपूर (का. प्र ):कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी चंद्रपूर शहर,ऊर्जानगर व दुर्गापूर या भागात १७ जुलै ते २६ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला आहे. आज दुपार पर्यंत नवीन १७ कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २६० वर पोहोचली आहे. आतापर्यंत अक्टिव्ह रुग्णांची संख्या ११२ असून पूर्णपणे बरे झालेले रुग्णांची संख्या […]
अशी केली डॉ. आंबेडकर जयंती साजरी
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कुटूंबियांसमवेत नागपूर येथील निवासस्थानी महामानव डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जयंती साजरी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खासदार बाळू धानोरकर, आम. प्रतिभा धानोरकर यांनी घरातच साजरी केली.
शैक्षणिक दीपस्तंभ निर्मित ‘पर्यावरण विशेषांक २०२३’ चे थाटात प्रकाशन.
राजुरा :– शैक्षणिक दीपस्तंभ व अक्षरधन पब्लिकेशनच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून २०२३ रोजी ‘शैक्षणिक दीपस्तंभ पर्यावरण विशेषांक २०२३’ प्रकाशित करण्यात आला. या अंकाचे प्रकाशन बादल बेले, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था (भारत) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विजय जांभुळकर अध्यक्ष- नागपूर विभाग, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन […]



