

राजुरा :– शैक्षणिक दीपस्तंभ व अक्षरधन पब्लिकेशनच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून २०२३ रोजी ‘शैक्षणिक दीपस्तंभ पर्यावरण विशेषांक २०२३’ प्रकाशित करण्यात आला. या अंकाचे प्रकाशन बादल बेले, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था (भारत) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विजय जांभुळकर अध्यक्ष- नागपूर विभाग, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत ‘ प्रा.डॉ. विद्या ठवकर – भंडारा, मिलिंग पगारे सेवानिवृत्त आय.टी.इंजिनिअर – नाशिक, प्रतिभा साळुंके प्रकाशक अक्षरधन पब्लिकेशन, साहित्यिक व शैक्षणिक दीपस्तंभची संपूर्ण संपादकीय टीम उपस्थित होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सह संपादिका – करुणा गावंडे जांभुळकर – चंद्रपूर यांनी केले, तर प्रास्ताविक – वर्षा सांगवीकर – लातूर यांनी केले. मान्यवरांचा परिचय रेखा शिंदे – संभाजी नगर यांनी केला तर उपस्थितांचे स्वागत जया कुलथे – अहमदनगर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्री फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रामेश्वरी सुतार यांनी स्वागत गीत गायन केले तर वैशाली टिचकुले यांनी पर्यावरणावर आधारित अंभगाचे गायन केले.
पर्यावरण, मानवी जीवन अत्यंत मोलाची बाब आहे सर्वांना यातील महती,नातं हे जपायला हवं. विशेषांक अतिशय सुंदर त्यातील अंतरंग काव्य, लेख समाजाला उपयुक्त असे विचार मांडले आहेत . आणि हा विशेषांक वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था नक्कीच केली जाईल असे अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी मा मिलिंद पगारे यांनी टाकावू मधुन टिकाऊ वस्तू तयार करणे याबद्दल रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या इतरत्र फेकून न देता प्रदुषणापासून वाचविणे यांचा एक सुंदर सुशोभित वस्तू तयार करुन दाखविले आणि मार्गदर्शन केले पर्यावरण जपाआरोग्य नीट ठेवा या प्रकाशन कार्यक्रम निमित्ताने मा विजय जांभुळकर यांनी केले.
आधीच आपले संत महात्मे पर्यावरणाचा मानवी नात्यांबदल्ल सांगून गेले आहेत. जतन करावे वृक्षाचे, आरोग्य राही आंनदाचे. निसर्गाचा आणि मानवाचा अतुट नातं आहे.सृष्टीमधील जैवविविधता जोपासली गेली पाहिजे असे प्रतिपादन प्रमुख अतिथी प्रा डॉ विद्या ठवकर यांनी केले. संपादकीय मनोगतातून सुदाम साळुंके यांनी पर्यावरण संवर्धन व संरक्षण करण्यासाठी समाजाने एकत्र आले पाहिजे व त्यासाठी प्रत्येकाने पर्यावरण महत्व जाणून घेणे गरजेचे आहे. या विशेषाकांचा फायदा नक्की होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यात संपूर्ण टीम ने अतिशय मेहनत घेतली असे संपादकीय मनोगत मा सुदाम साळुंके यांनी व्यक्त केले.यावेळी उपस्थित साहित्यिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. विशेषांक निर्मिती मध्ये शैक्षणिक दीपस्तंभच्या संपूर्ण टिमने मेहनत घेतली. कार्यकारी संपादक नवनाथ सुर्यवंशी व सह संपादक ज्ञानेश्वर सैंदाने यांनी निर्मितीमध्ये आपले योगदान दिले. यात महाराष्ट्रातील 54 लेखक/ कवी यांचे पर्यावरण जनजागृतीवर आधारित लेख व काव्य प्रकाशित करण्यात आले. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सर्वाना मार्गदर्शक ठरेल असा हा अंक प्रकाशन सोहळा थाटात पार पडला. प्रकाशन सोहळा कार्यक्रमाचे नियोजन व संचालन- करुणा गावंडे यांनी अतिशय सुंदर केले . मान्यवरांचे आभार- रुपाली गोजवडकर – नांदेड यांनी मानले.
शैक्षणिक दीपस्तंभ पर्यावरण विशेषांक सोहळा कार्यक्रम अतिशय सुंदर पणे यशस्वीपणे पार पडला.


