चंद्रपूर (का. प्र )चंद्रपूर जिल्हयात जीवनावश्यक वस्तुंची विक्री व भाजी विक्रीकरिता सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत वेळ नेमून देण्यात आली आहे. इतर व्यवसायांना सुध्दा विशिष्ट वेळ नेमून देण्यात यावी व व्यवहार सुरळीत करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे करण्यात आली आहे.
आज भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, चंद्रपूरच्या महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची भेट घेत सदर मागणी त्यांच्यासमोर मांडली. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांना जिल्हयातील विविध शहरातील व्यापारी मंडळांनी जीवनावश्यक वस्तु व्यतिरिक्त मोबाईल शॉप, स्टेशनरी, रेडीमेड गारमेंट आदी व्यवसायांशी संबंधित व्यवहार सुध्दा सुरळीत करावे अशी मागणी केली आहे.



