चंद्रपूर (का.प्र ):वाळू तस्करांकङून पैशाची देवाण घेवाण करणा-या महिलेविरुद्ध घुग्घुस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात झामरे ब्रदर्स नावाच्या गाडीचाही उल्लेख पोलीस तक्रारीत होता. या गाडीचा मालक आरोपी विक्रांत उर्फ विक्की परमेश्वर झामरे (39) रा.संतोषीमाता वार्ड बल्लारशाह यास शुक्रवार(10 जुलै )ला मध्यरात्री घुग्घुस पोलीसांनी अटक केली आहे तर इतर आरोपी फरार आहेत. पैश्याची देवान-घेवान करनारे रेती तस्कर मात्र मोकाटच आहे आता पर्यंत महसुल प्रशासनाने कोणतीच कारवाही केली नाही वढा येथील हजारों ब्रास रेती साठा गजानन वरारकर यांच्या शेतात जमा केलेला जप्त केला नाही व कोणतीच कारवाही केली नाही त्यामुळे महसुल प्रशासनाच्या कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.गेल्या 19 जून शुक्रवारला घुग्घुस येथुन जवळच असलेल्या वढा येथे ऊत्खनन अधिकारी असल्याची सांगुन वाळू तस्करांकङून पैशाची देवाण घेवाण करणा-या तोतया महिला व तिच्या साथीदारांचा व्हीडीओ वायरल झाला. घुग्घुस परिसरातील रेती तस्करांनी आपला मोर्चा वढा नदीच्या रेती घाटांवर वळविला आहे.घुग्घुस येथुन जवळच असलेल्या वढा गावाच्या वाळू घाटांवरुन अवैध रेती तस्करी ट्रॅक्टर ट्राली द्वारे सुरु होती.हिच संधी साधुन प्रिया झांबरे महिलेने स्काॅर्पीओ क्रमांक एमएच 34 बीएफ 4449 मध्ये तिन इसमांना सोबत घेऊन वढा गावात दाखल होऊन त्यांनी गावचे पोलीस पाटील किसन वरारकर यांना भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला व आम्ही उत्खनन विभागातुन आलो आहे, असे सांगितले. पोलीस पाटील येताच त्याच्या सोबत वाळू घाटांवर जाऊन एक ट्रॅक्टर पकडले व त्यालाही तेच सांगुन ट्रॅक्टर लावण्याची धमकी दिली. त्या ट्रॅक्टर धारकाकडुन हजारों रुपयाची मोठी रक्कम वसुल करुन तथाकथितांनी पोबारा केला.“भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक अल्का खेडकर यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी जिल्हा अधिकारी चंद्रपुर व जिल्हा उत्खनन अधिकारी यांना माहिती दिली. त्यांचे आदेश मिळताच तथाकथित एका महिलेची व तिच्या तिन सहकारी विरुद्ध पोलीसांत तक्रार दिली.”यात पैश्याची देवाण घेवाण करनारे वाळू तस्कर व तोतया उत्खनन अधिकारी महिला व तिचे सहकारी अडकण्याची दाट शक्यता आहे.वाळू तस्करांवर ही गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे दरम्यान घुग्घुस परिसरातील वाळू तस्करीमुळे सर्वसामान्यांचा प्रशासनावर रोष प्रचंड तिव्र झाला आहे.
Related Articles
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 16 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू
* गत 24 तासात 23 कोरोनामुक्त * आतापर्यंत 22,491 जणांची कोरोनावर मात * ॲक्टीव पॉझिटिव्ह 151 चंद्रपूर, दि. 28 : 23 जणांनी कोरनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 16 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीताचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 31 वर पोहोचली आहे. तसेच […]
मणिपूर अत्याचाराच्या घटनेचा राजुरा येथे तीव्र निषेध
मणिपूर राज्यात महिलांवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात राजुरा येथील नागरिकांनी तीव्र निषेध नोंदवित मोर्चाद्वारे तहसील कार्यालयाला धडक दिली. यावेळी जोरदार घोषणा देऊन मणिपूर येथील महिलांवर अत्याचार करणार्यांना कठोर शिक्षा द्यावी, मणिपूर सरकार बरखास्त करा, केंद्र सरकारचा निषेध असो, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान चौकातून मोर्चा […]
चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३५९
२१४ कोरोनातून बरे ; १४५ वर उपचार सुरु चंद्रपूर दि. २४ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३५९ झाली आहे. काल रात्रीपासून सायंकाळपर्यंत उशिरा पुढे आलेल्या २३ बाधितांमध्ये मुल तालुक्यातील पाच, गडचांदूर तालुक्यातील एक, चंद्रपूर महानगर क्षेत्रातील सहा व चिमूर येथील चार, घुग्घुस दोन, बल्लारपूर दोन, बाधितांचा समावेश आहे. तसेच ब्रम्हपुरी येथील झीलगोडी येथील एका […]



