चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

ब्रम्हपूरी- शेतात काम करीत असलेल्या शेतकर्‍यावर वाघाने हल्ला (Tiger attack) करून ठार केले. ही घटना तालुक्यातील कुडेसावली येथील शेतशिवारात शनिवार, 22 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. सदाशिव रावजी उंदिरवाडे (65) असे मृतक शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांच्या जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच गावकर्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. माहिती कळताच आवळगावचे वनक्षेत्रसहायक ए. पी. करंडे आपल्या कर्मचार्‍यासह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मे़डकी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ब्रम्हपुरी येथे पाठवला. एक दिवस अगोदर हळदा येथील महिलेला वाघाने ठार केले होते. ही घटना ताजी असताना कुडेसावली येथे घडलेल्या या घटनेने परिसरातील गावकर्‍यांमध्ये दहशत पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.