वरोरा(ता.प्र): नागपूरवरून तीन युवक चारचाकी गाडीने येत असतांना समोरचे चाक अचानक निघाल्याने घटनास्थळी दोघांना मृत्यू झाला. तर एका जणाचा ग्रामीणरुग्णालयात वरोरा येथे नेत असतांना वाटेत मृत्यू झाला. रविवार दिनांक २१ जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास नागपूरवरून सिद्धेश पंढरीनाथ साळगावकर (३६) सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग,सुनीलकुमार अग्रवाल (४०) राजस्थानचे पण हल्ली मुक्काम चंद्रपूर व दशरथ. व्ही. पट्टे (४०) चंद्रपूर हे तिघे जण चंद्रपूरचे होते. मांगली गावाजवळ ड्रायव्हरच्या बाजूचे चाक अचानक निघाले त्यामुळे कार वेगाने असल्यामुळे समोरच्या झाडावर आदळली त्यात दोघांचा जागीच व एकाच वरोरा ग्रामीण रुग्णालयात नेतांना वाटेत मृत्यू झाला.
Related Articles
25 एप्रिल रोजी ऑरेंज तर पुढील चार दिवस येलो अलर्ट जारी
पाऊस, वादळी वारा, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन चंद्रपूर, दि. 24 : भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात 24 ते 28 एप्रिल 2023 या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व जिल्ह्यातल एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, वादळ वारा (वेग 40-50 कि.मी. / तास) आणि गारा पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तसेच 25 ते 28 एप्रिल 2023 या दिवसांकरीता यलो अलर्ट व […]
जागतिक योग दिनी इको-प्रो व भारतीय पुरातत्व विभाग चा संयुक्त उपक्रम
नियमित योग करीत आरोग्य जपण्याचा तर ऐतिहासिक स्मारक, किल्लावरुन ऐतिहासिक वारसा संवर्धनाचा संदेश आरोग्यासाठी योगा, व्यायाम करिता किल्ला परकोटाचा वापर करीत वारसा संवर्धन करण्याचे आवाहन चंद्रपुर : आज जागतिक योग दिनाचे दिवशी गोंडराजे यांचे समाधिस्थळ चंद्रपुर किल्ला परकोट वरुन योग दिन साजरा करित, आपले आरोग्य व शहरातील ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्याच्या संदेश भारतीय पुरातत्व विभाग […]
गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक
ब्रम्हपुरी पोलीसांची कार्यवाही ५० गोवंश जनावरे सह २९ लाख रू चा मुददेमाल जप्त ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा भुज ते एकारा रोड दरम्यान अवैधरीत्या गोवंश जनावरे वाहतुक होत असल्याचे खात्रीशिर खबरेवरून ब्रम्हपुरी पोलीसांनी नाकाबंदी करून अवैध जनावरांची वाहतुक होत असलेले दोन आयसर ट्रक वाहन ताब्यात घेवुन सर्व गोवंशाना गोरक्षण केंद्रात जमा केले. आरोपींविरोधात पोस्टे […]



