चंद्रपूर(का.प्र ):केंद्र सरकारने शेतकरी विरोधात तीन विधेयके नुकतेच संसदेत मंजूर केली. या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होणार म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला. त्या अनुषंगाने पक्षश्रेष्टींच्या निर्देशानुसार जिल्ह्यात २६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर आंदोलनाची मालिकाच राबविण्यात येणार आहे. त्यानुसार आज महानगर पालिकेसमोर सकाळी गांधी चौकात काँग्रेस नेत्यांनी केला आंदोलनाचा श्री गणेशा केला. व आज येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. याबाबत आपले विचार मांडतांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार , बाळूभाऊ धानोरकर व काँग्रेस कार्यकर्ते पहा हा व्हिडीओ .




