चंद्रपुर

बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण अनिवार्य

उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 42;
56 बाधित कोरोना मुक्तØ एकूण बाधितांची संख्या 98
Ø आतापर्यंत जिल्ह्यात 84 हजारावर नागरिक दाखल
Ø संस्थात्मक अलगीकरणात 943 नागरिक
Ø गृहअलगीकरणात 2 हजारावर नागरिक
Ø 81 हजारांवर नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण
Ø सध्या 14 कंटेनमेंट झोन कार्यरत
चंद्रपूर, दि. 2 जूलै: जिल्ह्यामध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण अनिवार्य असणार आहे. आतापर्यंत आढळलेले कोरोना बाधित हे बाहेरून आलेल्यांपैकी आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग इतरांना होऊ नये तसेच संसर्गाची चेन खंडित व्हावी यासाठी संस्थात्मक अलगीकरण महत्त्वाचे आहे.नागरिकांनी कोरोना संसर्गाला घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 98 वर पोहोचली आहे. यापैकी 56 बाधित कोरोना मुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 42 इतकी आहे. 40 बाधित कोविड केअर सेंटर वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आले आहे. तर दोन बाधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आले. या सर्व बाधितांची प्रकृति स्थिर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *