चंद्रपुर जिल्हा

गडचांदूर येथील महिला हत्याकांड प्रकरणातील आरोपीला 24 तासात अटक,,

गडचांदूरप्र (ता.प्र.) वॉर्ड क्र,4 येथील जिल्हा परिषद शाळेजवळ एकटीच राहत असलेली महिला लंकाबाई निळकंठ मेश्राम(60)हिचा राहत्या घरी 30 जून ला सायंकाळी 4 वाजता कुजलेल्या संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता,मृतक महिलेचा पती सेवानिवृत्त वनरक्षक नीलकंठ मारोती मेश्राम(72)यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या रिपोर्ट नुसार गडचांदूर पोलिसांनी अकस्मात मृत्यू ची नोंद केली,उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार,ठाणेदार गोपाल भारती,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, उपनिरीक्षक, शुभांगी ढगे,फिंगरप्रिंट तज्ज्ञ,फॉरेसिक चमू यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला,पुरावे जप्त केले,प्रेत पोस्टमार्टेम साठी ग्रामीण रुग्णालयात पाठीवले,पोस्टमारटम रिपोर्ट मध्ये डोक्यावर गंभीर जखमा झाल्या मुळे मृत्यू झाल्या चा अहवाल मिळताच अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपासची सूत्रे वेगाने हलविले, गोपनीय माहिती च्या आधारे संशयित आरोपी म्हणून अब्दुल खलील अब्दुल रशीद शेख(22)रा,वॉर्ड न,4 गडचांदूर याला आज पहाटे 1 वाजता अटक केली,आरोपीने गुन्हा कबूल केलं असुन मृतक महिला च्या घरी चोरी करण्याच्या उद्देश ने जाऊन महिलेच्या डोक्यावर दगडी पाटा, वीट, भांडी,यांनी वार करून ठार केल्याचे कबूल केले,गडचांदूर पोलिसांनी
आरोपीला 24 तासाच्या आत अटक करून प्रशंसनिय कार्य केले आहेत,
या प्रकरणचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल भारती, प्रमोद शिंदे, उपनिरीक्षक शुभांगी ढगे,चौधरी, धर्मराज मुंढे,जगदीश झाडे,रोहित चिडगिरे करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *