चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

जुगार अड्डा पोलिसांनी केला उध्वस्त, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

शेतात सुरू होता जुगार..आणी अचानक पोलिसांची धाड | Sakal

संचालकांसह 85 जुगाऱ्यांवर कारवाई

राजुरा : तेलंगणा राज्यातून थेट महाराष्ट्राच्या सीमेत येऊन मनोरंजनाचा शासकीय परवाना घेऊन चक्क जुगार भरवणाऱ्या सोशल युथ क्लबच्या नावाने युवकांना वाईट वळणावर नेणाऱ्या जुगार अड्ड्यावर थेट अप्पर पोलीस अधीक्षकांना धाड घालवी लागली. ह्या क्लबच्या नावाने अवैधरित्या मध्यरात्रीपर्यंत खेळल्या जात असलेल्या जुगाराची स्थानिक पोलिसांना माहिती नसणे किंवा त्यांचे दुर्लक्ष होणे हा गंभिर प्रकार असुन चक्क अप्पर पोलीस अधीक्षकांना जातीने जुगार अड्ड्यावर येऊन धाड घालवी लागणे, जुगाऱ्यांनी चक्क पोलिसांना धक्कबुक्की करणे काही पोलिसांचे जखमी होणे ह्या प्रकाराने स्थानिक पोलीस ठाण्याचे अपयश असल्याची टीका करण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त असे की, तेलंगणा राज्याच्या सीमेवरील शेवटचा तालुका असलेल्या राजुरा तहसील मुख्यालयापसून अवघ्या 10 किमी अंतरावर तेलंगणा राज्यातील काही लोकांनी मनोरंजन क्लबच्या नावाने परवाना प्राप्त केला. मनोरंजन क्लब साठी शासनाने काही नियम व अटी घालुन दिल्या असुन परवाना धारकांनी त्यांचे पालन करणे अपेक्षित असते मात्र थेट परराज्यातून येऊन परवाना प्राप्त करून चक्क राज्याच्या नियमांना डावलून रात्री 10:00 नंतरही क्लब सुरू ठेवणे, मान्यता नसतानाही जुगार भरविणे असे प्रकार सोशल युथ क्लब मधे सुरू होते. वास्तविक बघता मंदिर, शाळा, दवाखाने ह्यांच्यापसून विशिष्ठ अंतरावर क्लब सुरू करण्याची परवानगी देण्यात येते मात्र सदर क्लब चक्क शाळेपासून हाकेच्या अंतरावर सुरू झाल्यामुळे क्लब सुरू करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र कसे काय देण्यात आले? स्थानिक ग्रामपंचायतीने नियमबाह्य मान्यता कशी दिली ह्याचीही सखोल चौकशी होणे गरजेचे असून क्लबच्या परिसरात वाहतूक नियंत्रणाच्या नावाखाली तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांना तसेच ठाणेदारांना अवैधरित्या सुरू असलेल्या जुगाराचा सुगावा लागू नये हे शक्य आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्राप्त माहितीनुसार राजुरा तालुक्यातील वरुर रोड येथील सोशल युथ क्लबवर अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुळकर्णी यांनी प्राप्त माहितीच्या आधारे आपल्या पथकासह शनिवार दिनांक 7 मे रोजी रात्री उशिरा छापा टाकला. मनोरंजन क्लब सुरू ठेवण्यासाठी वेळेची विशिष्ट मुदत असते मात्र ह्या क्लब मधे रात्री उशिरापर्यंत नियमबाह्य जुगार सुरू असताना झालेल्या कारवाईत जुगार खेळणाऱ्या ८५ जणांसह क्लबच्या अध्यक्षावरही गुन्हा दाखल करण्यात आला. राजुरा तालुक्यातील विरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वरुर रोड येथे सोशल युथ क्लब आहे. मागील काही दिवसांपासून हा क्लब सुरू आहे. शासकीय नियमानुसार रात्री दहा वाजेपर्यंत वेळ क्लबसाठी देण्यात आला आहे. मात्र, क्लबचे मालक उशीरापर्यंत क्लब सुरू ठेवत असल्याची तसेच मनोरंजनाच्या नावाखाली जुगार भरविण्यात येत असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली होती. 

अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुळकर्णी यांनी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास सापळा रचून क्लब वर अचानक धाड घातली ह्यावेळी जुगार खेळणारे आणि पोलिस यांच्यात धक्काबुक्की झाली. झटापटीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांना टिनचे लोखंडी शेड लागल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. जुगारी लोकांनी चक्क पोलिसांनाच धक्काबुक्की केल्यामुळे अखेर अप्पर पोलिस अधीक्षकांनी सी -६० कमांडो, दंगा पथकाला पाचारण केले. पथकाने ८५ जुगार खेळणारे, युथ सोशल क्लबचे अध्यक्ष व्यंकटेश मल्लया तोटा, शेर श्रीकांत, श्रीनिवास गंगारेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल केला. ह्यापैकी शेर श्रीकांत, श्रीनिवास गंगारेडी हे गोंधळाचा फायदा घेत पसार झाले असून घटनास्थळावरून एक कार, संगणक, सीसी प्लस डीव्हीआर सह अन्य साहित्य जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किमत १६ लाख ८८ हजार ६९२ रुपये आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी युथ सोशल क्लब अध्यक्ष वेंकटेश मल्लय्या तोटा यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.