२ लक्ष ७३ हजार रुपये दंडासह १५४० केसेसची नोंद
चंद्रपूर (का. प्र ):लॉकडाऊन असतांना नागरिकांनी सोशल डिस्टेंसिंगचे पालन करून मास्क वापरेबाबत आदेश पारित झाले. आहे. आदेशाचे उल्लंघन होऊ नये या करीता प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. परंतु उल्लंघन करणाऱ्या इसमांवर सलग दुसऱ्या दिवशीही चंद्रपूर पोलीस दलातर्फे ऑल आऊट ऑपरेशन राबवून कार्यवाही करण्यात आली आहे. आज दिनांक २५ जुलै २०२० रोजी नागरिकांनी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या इसमावर ज्या मध्ये मास्क न वापरणे व सोशल डिस्टेंसिंगचे नियमन पाळणाऱ्या इसमांवर कार्यवाही करण्यात आली असून या मध्ये मास्क न वापरणाऱ्या इसमाविरुद्ध ९१३ केसेस दाखल करण्यात आल्या असून १,८०,६३०/-रु दंड वसूल करण्यात आल्या आहे. तसेच सोशल डिस्टेंसिंगचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध ५७ केसेस दाखल करण्यात आल्या असून १५,६००/-रु दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच इतर कार्यवाही मध्ये ५७० केसेस करून ७६,८००/-रु दंड वसूल करण्यात आला असून एकूण १५४० केसेस करण्यात आल्या व एकूण २,७३,०३०./-रु दंड वसूल करण्यात आला आहे. तरी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे. कि चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना (कोविड १९) विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाद्वारे निर्गमित केलेल्या संचारबंदी आदेशाचे पालन तसेच मास्क व सोशल डिस्टेंसिंगचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. तसेच सदरची मोहीम यापुढे सुरु राहणार असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.


