चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २९४

मूल येथील राईस मीलमधील आतापर्यत २४ कामगार पॉझिटीव्ह                                              उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या १३१
                                       १६३ बाधित कोरोनातून बरे
चंद्रपूर,दि. २० जुलै: चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हमध्ये सोमवारी १८ बाधिताची भर पडली आहे. जिल्ह्यात सध्या २९४ बाधितांपैकी १६३ बाधिताना कोरोनातून बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. तर १३१ जणांवर उपचार सुरू आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये ४८ बाधित हे परराज्यातील व परजिल्ह्यातील आहेत. या बाधितामध्ये ३ जण अॅन्टीजेन चाचणीतून बाधित म्हणून पुढे आले आहेत.आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये मुल येथील राईस मिल मध्ये काम करणाऱ्या १२ कामगारांचा समावेश आहे . १२ जुलै रोजी बिहार राज्यातून कामगारांची एक चमू मूल येथे आली होती. यापूर्वी १२ कामगार पॉझिटीव्ह ठरले होते. आजच्या १२ कामगारांमुळे एकूण २४ कामगार पॉझिटिव्ह झाले आहेत.चंद्रपूर महानगरातील यापूर्वी पॉझिटिव आलेल्या जैन मंदिर तुकुम परिसरातील एका बाधितांचे दहा व पंधरा वर्षीय मुले चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. मुल येथील रहिवासी असणाऱ्या 30 वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भुसावळ येथून प्रवासाची त्यांची नोंद आहे कोरपना तालुक्यातील उपरवाही या प्रतिबंधात्मक क्षेत्रातील गावातील ताप सदृश्य आजाराने ग्रस्त असणारा 36 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह ठरला आहे.सोबतच ब्रह्मपुरी तालुक्यातील दोन जण पॉझिटिव्ह ठरले आहे. यामध्ये हैदराबाद येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ब्रह्मपुरी तालुक्यातील किनी येथील 29 वर्षीय युवकाचा समावेश आहे. कुर्झा येथे संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या या युवकाचा काल स्वॅब घेण्यात आला होता.अमरावती येथून ब्रह्मपुरी पटेल नगर येथे परतलेल्या 29 वर्षीय महिलेचा २ स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे. 15 जुलैला अमरावती येथून परतल्यानंतर ही महिला संस्थात्मक अलगीकरणात होती. 18 जुलैला स्वॅब घेण्यात आला. महिला आता पॉझिटिव्ह ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.