चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

आरोग्य सेवेत परिचरिकांची भूमिका देवदूतांसारखी- डॉ.मंगेश गुलवाडे यांचे प्रतिपादन

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात

मागील काही वर्षांत देशाची आरोग्यसेवा बळकट झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ही प्रक्रिया सुरू आहे.कोरोनाची सर्वांना मिळालेली लस हे याचे उत्तम उदाहरण आहे.असे असले तर या संपूर्ण प्रक्रियेत परिचरिकेची भूमिका महत्त्वाची होती.परिचारिका या देवदूतांसारखी आहे,असे प्रतिपादन डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले.ते महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय, चंद्रपूर तर्फे
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन निमीत्य आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ठ परिचारिकांचा सत्कार करतांना शुक्रवारी बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चंदन सिंह चंदेल( माजी अध्यक्ष महाराष्ट्र वन विकास महामंडळ)यांची तर
प्रमुख पाहुणे म्हणून उदय नावेकर (आवाळपूर सिमेंट वर्क्स अल्ट्राटेक सिमेंट ,नंदलाल राठोड (सहाय्यक कल्याण आयुक्त, नागपूर विभाग ) यांची उपस्थिती होती. कामगार कल्याण केंद्र, बल्लारपूर येथे झालेल्या या कर्यक्रमाचे आयोजन
सुरेश ईटनकर (केंद्र संचालक कामगार कल्याण केंद्र, बल्लारपूर)यांनी केले.अशी माहिती कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर अळणे
यांनी दिली आहे.यावेळी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या परिचरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *