
चंद्रपूर – मागील 3 दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इरई धरणातील पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत असल्याने 11 जुलै ला धरणाचे क्रमांक 1 व 7 हे दरवाजे 0.25 CM ने उघडण्यात आले असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे.
याकरिता नदी काठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे. इरई धरणाची एकूण क्षमता 207.5 m असून सध्या 206.5 m ने धरण भरले आहे.
पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने इरई नदी तुडुंब भरून वाहत आहे, दरवाजे उघडल्याने काही भागात पुरजन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून जिल्हा आपत्ती प्रशासन व चंद्रपूर मनपा प्रशासनाने मदत क्रमांक जारी केले आहे.



