चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

चंद्रपुरात आई व 2 मुलींचा मृत्यू…

चंद्रपूर – 21 जून ला दुपारच्या सुमारास आई व 2 मुलींच्या मृत्यूने चंद्रपूर जिल्हा हादरून गेला. दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वरवट येथे रामटेके कुटुंबातील 40 वर्षीय संगीता रामटेके, मुलगी 16 वर्षीय रागिणी व 14 वर्षीय प्राजक्ता हे घरासमोरील अंगणात बसून असताना अचानक पणे वीज कोसळली यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूविषयी अजूनही सस्पेन्स कायम असून वीज कोसळल्याने किंवा विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. कुटुंब प्रमुख गौतम रामटेके ऑटो चालवितात नेहमीप्रमाणे ते ऑटो घेऊन बाहेर गेले होते, मात्र दुपारी 1 ते 2 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. आज दुपारच्या सुमारास ढगाळ वातावरणाने विजेचा कडकडाट झाला होता.शवविच्छेदन अहवालानंतर तिघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पुढील तपास दुर्गापूर पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *