चंद्रपुर जिल्हा

श्री भद्रनाग स्वामी देवस्थान ट्रस्टद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता कोषात पाच लक्ष रुपये दान

भद्रावती (ता.प्र.)येथिल श्री भद्रनाग स्वामी ट्रस्टच्या वतीने कोरोना व्हायरसच्या निमित्ताने देशावर ओढवलेल्या आकस्मिक स्थितीला तोंड देण्याकरिता सदर देवस्थान ट्रस्टतर्फे तहसिलदार महेश शितोडे यांच्यामार्फत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाच लक्ष रुपयाचा धनादेश पाठविण्यात आला आहे. देशावर ओढवलेल्या या परिस्थितीत निधीची कमतरता भासू नये याकरिता अनेक सामाजिक व धार्मिक संस्था सोबतच दानदाते पुढे येवुन देशहिता करिता आपआपल्यापरिने आर्थीक सहकार्य करित आहे. यावेळी भद्रनाग स्वामी देवस्थान ट्रस्टची गणना क्षेत्रातील मोठ्या संस्थेत होत असुन सदर संस्थेच्या पदाधिकाèयांनी आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचे मोठे कार्य सुद्धा एकशे एक गरजु, गरीबांना जिवनावश्यक वस्तुंचे किटचे वितरण करुन केले आहे.

येथील श्री भद्रनाग स्वामी ट्रस्टद्वारे देण्यात आलेला पाच लक्ष रुपयाचा धनादेश स्विकार करत तहसिलदार महेश शितोळे यांनी सदर संस्थेच्या पदाधिकाèयांचे आभार मानत म्हटले की, देशावर ओढवलेल्या या परिस्थितीत सामाजिक व धार्मीक संस्था सोबतच दान दात्यांवर देशाला या संकटातुन बाहेर काढण्याकरिता सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्री राहत कोशात निधी असल्याचे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सोईचे जाते म्हणुन दान दात्यांनी पुढाकार घेवुन राष्ट्रहितात आपले योगदान द्यावे असे आवाहन शितोळे यांनी केले. याप्रसंगी श्री भद्रनाग स्वामी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.रमेश मिलमिले, सचिव मधुकर सातपुते, उपाध्यक्ष निळकंठ एकरे, सहसचिव योगेश पांडे, ठाणेदार सुतीलqसग पवार आदींसह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *