चंद्रपुर जिल्हा

कोरोनामुळे लॉकडाऊन असतांना राजुऱ्यात प्रशासन दक्ष

राजुरा (ता.प्र) आज संपूर्ण दिवसभरात कोरोना आणि लॉकडाऊन च्या पाश्र्वभूमीवर राजुरा तालुक्यात विविध स्तरांवर प्रशासकीय दक्षता घेतली जात असल्याचे चित्र आहे. शहरातील दैनंदिन भाजी बाजारात लॉकडाऊन च्या काळातही मोठी गर्दी होत असल्याने लॉकडाऊनच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासले जाताना दिसत होते. शेवटी नगराध्यक्ष अरुण धोटे, मुख्याधिकारी आर्शीया जुही आणि तहसीलदार डॉ. रवींद्रहोळी यांच्या नियोजनात सकारात्मक निर्णय घेऊन दैनंदिन भाजी बाजार सोमनाथपूर येथील आठवळी बाजार परिसरात नियमित सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राजुरा नगर परिषद प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली. तर संपूर्ण शहरात महसूल व पोलीस प्रशासन दक्षता घेताना दिसत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *