चंद्रपुर जिल्हा

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या २ दुकानदारावर कारवाई

गडचांदूर (ता.प्र.)कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने १४ एप्रिल पावेतो संचारबंदी लागू केली आहेत. या दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २ दुकानदारावर गडचांदूर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांनी भादंवि १८८ नुसार गुन्हा नोंद करून कारवाई केली. यामध्ये गडचांदूर व नांदा फाटा येथील दुकानदाराचा सामावेश आहे. विनाकारण मोटारसायकलवर फिरणाèया वाहनांच्या चाकातील हवा सोडण्यात आली. संचारबंदी काळात नागरीकांनी घराबाहेर निघू नये, प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांनी केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.