चंद्रपूर (का.प्र) महाराष्ट्रात व्यापारी केंद्र सरकारच्या हमी भावानुसार कापूस खरेदी न करता शेतकऱ्यांची लूट करत असल्याने सीसीआय द्वारे खरेदी कापूस केला जातो यावर कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे नियंत्रण ठेवले जाते परंतु काही कृषि उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत होते टोकन पद्धतीशिवाय कापूस खरेदी केला जात नव्हता टोकन करिता अडवणूक करून पैसे वसुलीचा आरोप होत होता काही ठिकाणी अडत्यांचा कापूस खरेदीला प्राधान्य दिले जात होते प्रत्येक गाडीमागे ग्रेडर पैशाची मागणी करीत होते आज जवळपास ७० गाडी कापूस शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आणला असता खरेदी बंद असल्याच्या सुचना देण्यात आल्या जीव घेण्यात उन्हात शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा होत होत्या बाजार समितीची अडवणूक कूपन प्रणाली यामुळे शेतकर्यांचा संयम सुटल्याने युवा शेतकऱ्यांनी सकाळी १० वाजता चंद्रपूर आदिलाबाद राज्यमार्ग रोखून धरून चक्काजाम आंदोलन सुरू केले दोन तास शेतकरी उन्हात आंदोलन करीत होता अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर विलास यामावर यांनी आंदोलना स्थळ गाठून शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांच्या दबावाखाली टोकण पद्धती बाजूला ठेवून आज आलेल्या सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला आहेत सीसीआय द्वारे तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे.
Related Articles
अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी कडक कारवाई करा – जिल्हाधिकारी गौडा
चंद्रपूर : संस्कारक्षम समाज घडविण्यासाठी युवा पिढीला योग्य मार्गदर्शन करणे काळाची गरज आहे. ही युवा पिढी व्यसनाधीन होऊ नये, तसेच अंमली पदार्थ सेवनाच्या आहारी जाऊ नये, यासाठी जिल्ह्यात अंमली पदार्थाची साठवणूक, वाहतूक व विक्री करणा-याविरुध्द कडक कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत ते […]
मांगरूड येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार
चंद्रपूर(का.प्र.) जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मांगरूड येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार झाल्याची घटना दुपारच्या सुमारास उजेडात आली. मारोती उईके (43) मृतकाचे नाव असून तो सोनुली या गावातील आहे. मांगरूड गावातील शेतशीवारात शेतीकाम करण्यासाठी मारोती हा गेला होता. शेतशिवारात औषध फवारणीचे काम शेतात सुरु असल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी […]
आरोग्य शिबिराच्या प्रचार प्रसारासाठी स्थानिक यंत्रणा कार्यान्वित करा – आ. किशोर जोरगेवार
मनपा आयुक्तांना सुचना, भव्य आरोग्य शिबिर, संयुक्त नियोजन बैठक संपन्न नागरिकांचे आणि त्यातही विशेष: महिलांचे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहेत. पारिवारीक जबाबदारीच्या व्यस्ततेत रुग्णालयात उपचाराकरिता जाणे टाळणा-यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आता आपण रुग्णसेवाच नागरिकांच्या दारी नेण्याचा संकल्प केला असुन आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम राबवत शहरातील विविध भागात 11 भव्य आरोग्य शिबिर आयोजित करत आहोत. या शिबिराचा […]


