चंद्रपूर:गडचांदूर प्रभाग ७ येथे राहणारी महिला भेंडवी येथे शेताच्या कामावर गेली असता आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान वीज पडून ठार झाली. सुनंदा सुधाकर बावणे ३६ वर्ष असे तिचे नाव आहे. सुनंदा हि विधवा असून तिला एक लहान मुलगा व मुलगी आहे. भेंडवी येथील संतोष सलाम यांच्या शेतात ती काम करीत होती. घटनेची माहिती मिळताच राजुराचे तहसीलदार यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केला.अधिक तपास राजुरा पिलास करीत आहे.
Related Articles
मनपाद्वारे १७ जलमित्रांची निवड
जलसंवर्धनासाठी मनपाचे प्रयत्न जलमित्रांची नोंदणी सुरु चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे रेन वॉटर हार्वेस्टींगची जनजागृती करण्यास स्वेच्छेने काम करणाऱ्या १७ जलमित्रांची निवड करण्यात आली असुन सर्व जलमित्रांना त्यांचे नियुक्ती पत्र २४ मे रोजी मनपा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या हस्ते देण्यात आले. रेन वॉटर हार्वेस्टींगची जनजागृती करण्यास स्वेच्छेने काम करणारे जलमित्र मनपाद्वारे […]
१०० कलाकारांच्या होम ग्राउंडवर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हाउसफुल
स्पार्क जनविकास फाउंडेशनचे आयोजन गडचांदूर – २० वर्षापूर्वी चंद्रपुरातील तरुणांनी अख्खा महाराष्ट्र गाजवलेल्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या नाटकाचे २० वर्षानंतर नवकलाकारांसह नवीन लाँचिंग नुकतेच प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे पार पडले. कलाकारांच्या होम ग्राउंडवर पहिलाच शो हाउसफुल झाल्याने कलाकारांमध्ये उत्साह संचारला आहे. जुन्या-नवीन कलाकारांची सांगड घातलेल्या नाट्यकृतीने चंद्रपूरकरांना मंत्रमुग्ध केले. स्पार्क जनविकास फाउंडेशनच्या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी घेण्यात […]
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे स्वप्न घेतील गगण भरारी
क्रांतीबा सार्वजनिक वाचनालय चिरोलीला स्पर्धा परिक्षेचे ग्रंथ भेट राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे जाळे पसरवित स्पर्धा परिक्षेमध्ये जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीकोणाने सातत्याने प्रयत्न सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील वाचनालयांना स्पर्धा परिक्षेची पुस्तके भेट दिली जातात. या उपक्रमाअंतर्गत क्रांतीबा […]



