चंद्रपूर:गडचांदूर प्रभाग ७ येथे राहणारी महिला भेंडवी येथे शेताच्या कामावर गेली असता आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान वीज पडून ठार झाली. सुनंदा सुधाकर बावणे ३६ वर्ष असे तिचे नाव आहे. सुनंदा हि विधवा असून तिला एक लहान मुलगा व मुलगी आहे. भेंडवी येथील संतोष सलाम यांच्या शेतात ती काम करीत होती. घटनेची माहिती मिळताच राजुराचे तहसीलदार यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केला.अधिक तपास राजुरा पिलास करीत आहे.
Related Articles
अधिकाऱ्यांनी केली दीक्षाभूमी स्थळाची केली पाहणी
15 व 16 ऑक्टोबर 2022 ला चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर 66 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. या समारंभाला जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील आणि भारतातील अनेक अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. या निमित्त सुविधांची पाहणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दीक्षाभूमी स्थळाची पाहणी केली. चंद्रपूर […]
आजचे कोरोना अपडेट
जिल्ह्यात 24 तासात 4 कोरोनामुक्त, 7 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 54 चंद्रपूर, दि. 20 ऑगस्ट : गत 24 तासात जिल्ह्यात 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 7 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच एका बाधिताचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 7 […]
इको-प्रो चे गावठी हेल्थ स्टोर चे जिल्हाधिकारि यांचे हस्ते शुभारंभ…
संस्था कार्यालय खर्च भागविण्याकरिता संस्थेचा आरोग्यवर्धक उपक्रम इको-प्रो चे ‘उद्योग – उद्योजक विकास कार्यक्रम’ अभियानाची सुरुवात इको-प्रो संस्थेच्या ‘उद्योग-उद्योजक विकास कार्यक्रम’ अंतर्गत संस्थेचे आरोग्यवर्धक व विषमुक्त उत्पादन विक्रिचे केन्द्राचे शुभारंभ जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. गावठी हेल्थ स्टोर च्या शुभारंभ प्रसंगी स्वप्निल राठोड़, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, आशीष घोंगड़े, व्यवस्थापक, बैंक ऑफ़ बरोदा, […]



