चंद्रपुर

विजय वड्डेटीवारांच्या पुढाकारातून आंध्रप्रदेश व तेलंगणात अडकलेले मजूर स्वगृही परतणार

चंद्रपूर :(का . प्र ) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परराज्यात अडकलेले मजूर विध्यार्थी यांना स्वगृही आणण्यात यावे अशी वारंवार मागणी आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन ,इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,केंद्रीय परीवहन मंत्री नितीन गडकरी राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता ,मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव डाँ .नितीन करीर यांच्याकडे केली होती . तसेच आपत्ती व्यवस्थापन सचिव किशोर राजे निंबाळकर यांना केंद्र शासनास पत्र द्यावयास सांगितले होते. वडेट्टीवार यांनी या मागणीचा सतत पाठपुरावा केल्यामुळे परराज्यात अडकलेले मजूर ,विद्यार्थाना स्वगृही परतण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *