चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

लग्नाचे व-हाड घेऊन जाणारे क्रूझर वाहन पलटल्याने दोघांचा मृत्यू

◾नऊ जण जखमी

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील भिसी येथून आंबोली या गावी लग्नाचे व-हाड घेऊन जाणारे क्रूझर वाहन रस्ताच्याकडेला तीनदा पलटी मारत उलटल्याने एका वृध्देसह दोन व-हाड्यांचा जागीच मृत्यू झाला. तर नऊ जण जखमी झाले आहेत. ही घटना काल रविवारी (23 मे) लादुपारी साडेतीनच्या सुमारास भिसी – आंबोली मार्गावर पुयारदंड गावाजवळ घडली.चिमूर तालुक्यातील भिसी येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन क्रूझर क्र. MH 32 AH 0957 हे वाहन आंबोलीकडे जात असताना; काल रविवारी (23 मे) ला दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान पुयारदंड गावालगत वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन तीनवेळा पलटी घेत उलटले. यात आंबोली येथील 70 वर्षीय वृध्दा कमल मानकर आणि; श्रीराम राजेराम मानकर (वय 52) यांचा मृत्यू झाला. तर; नऊ जण जखमी झाले. जखमींमध्ये वाहनचालक अमोल किसन वाघ (वय 27) रा. भिसी, गार्गी संजय मानकर (वय 4), लक्ष्मण गायकवाड (वय 67), स्वाती मानकर (वय 21), शांता दडमल (वय 49), ज्योत्स्ना मानकर ( वय 37), नीळकंठ; जांभुळे (57), भगवान गुडधे (वय 70) सर्व मु. रा.आंबोली यांचा समावेश आहे. वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी तीनदा पलटी ; झाली व रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत कोसळली. भिसी पोलिसांना सूचना मिळताच पोलीस उपनिरीक्षक सचिन जंगम, सहायक पो. नि. जांभळे संपूर्ण ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. जखमी व मृताला बाहेर काढताना पोलिसांना व नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागली. जखमींना भिसी येथील प्रा. आ. केंद्रात प्राथमिक उपचिर करून काही गंभीर जखमींना; पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.