चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

राप्ती सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वे च्या एका डब्याल्या लागली आग

 

चंद्रपूर  – राप्ती सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वे च्या एका डब्यात आगीची बाब उघडकीस आली असून काही वेळ माजरी रेल्वे स्टेशनवर प्रवाश्यांची तारांबळ उडाली होती. शॉर्ट सर्किट मुळे रेल्वे डब्ब्यात आग लागली असा अंदाज वर्तविण्यात आला होता, रेल्वे अधिकारी पोहचले असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. Rapti Superfast Ex दुपारच्या सुमारास रेल्वे क्रमांक 12512 गोरखपूर-कोचीवेली सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वे थांबली असता अचानक डब्ब्यातून धुव्वा निघायला लागल्याने प्रवासी घाबरले. Gorakhpur-Kochuveli Superfast Express Railway जनरल डब्ब्यात आग लागली अशी माहिती उर्वरित प्रवाश्यांना मिळाली असता सर्व प्रवासी घाबरून रेल्वे च्या खाली उतरायला लागले, याबाबत माजरी रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांना सदर बाब कळली असता त्यांनी तात्काळ तिथे पोहचत आगीवर नियंत्रण मिळविले press Railway रेल्वे स्थानकावर उभी असल्याने मोठी घटना घडली नाही जर धावत्या रेल्वेत ही घटना घडली असती तर मोठी जीवितहानी झाली असती.

Leave a Reply

Your email address will not be published.