चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 24 कोरोना पॉझिटिव्ह

* गत 24 तासात 11 कोरोनामुक्त

* आतापर्यंत 22,726 जणांची कोरोनावर मात

* ॲक्टीव पॉझिटिव्ह 96

चंद्रपूर, दि. 13 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 11 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 24 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 23 हजार 215 झाली असून त्यापैकी बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 726 झाली आहे. सध्या 96 बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत दोन लाख सहा हजार 238 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 81 हजार 115 नमुने निगेटीव्ह आले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत 393 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 355, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 15, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.आज बाधीत आलेल्या 24 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील नऊ, चंद्रपूर तीन, बल्लारपूर दोन, भद्रावती तीन, राजुरा दोन, वरोरा एक व कोरपना येथील चार रुग्णांचा समावेश आहे.कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *