
ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णयही अखेर सर्वोच्च न्यायालयाने रद्दबादल ठरवून तातडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यामुळे अखेर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यात येणार असून राज्यातील विविध महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार असुन चंद्रपूर मनपाच्या निवडणुका घेण्यासाठी नविन प्रभाग रचनेचा आराखडा मनपा प्रशासनाने जाहिर केला असून राज्य निवडणुक आयोगाने कल चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेला मंजुरी प्रदान केली आहे.
बुधवारी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. प्रभागात आणि नगरसेवकांच्या संख्येतही वाढ झाली असून, आता चंद्रपुरात २६ प्रभाग आणि ७७ नगरसेवक असणार आहे. यात २५ प्रभाग ३ सदस्यीय तर दोन प्रभाग २ दोन सदस्यीय असणार आहे. यापूर्वी चंद्रपुरात १७ प्रभाग आणि ६६ नगरसेवक होते. ओबीसी आरक्षणाचा न्यायालयीन प्रक्रियेत असतानाच प्रभाग प्रारूप रचना मंजूर झाल्याने मनपाची निवडणूक ओबीसी आरक्षणाविनाच होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १५, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ८ तर खुल्या प्रवर्गासाठी ५६ जागा आरक्षित असणार आहे.
प्रभागाच्या सीमांकनात अनेक प्रभागांची तोडफोड झाल्याने सर्वच राजकीय पक्षांना नव्या समीकरणाची जुळवाजुळव करावी लागणार आहे. तर प्रभाग रचना मंजूर होताच राजकीय घडामोडींना पुढील काळात वेग येणार आहे.
प्रभाग १ दे. गो. तुकुमची लोकसंख्या १३ हजार ४९२ निश्चित झाली आहे. प्रभाग दोन तुकूम तलावमध्ये ११ हजार ७५८ लोक मतदान करणार आहेत. शास्त्रीनगर हा प्रभाग ३ असणार आहे. विवेक नगर प्रभाग 4 असुन पोलीस लाइन प्रभाग क्र. ५ असेल. या प्रभागाची जि लोकसंख्यया ८ हजार ३८३ आहे.
प्रभाग ६ वडगाव मधे एकूण लोकसंख्या १२ हजार २२० असणार आहे. प्रभाग ७ मध्ये सिव्हील लाइनचा समावेश आहे. या प्रभागाची लोकसंख्या १२ हजार ८९६ आहे. प्रभाग ८ नगिनाबागची लोकसंख्या १२ हजार ९९७ आहे. प्रभाग ९ जटपुरामध्ये १३ हजार ९०३ नागरिक मतदान करणार आहे. प्रभाग १० जलनगरमध्ये ११ हजार ५११ लोकसंख्या आहे.
प्रभाग ११ इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये ११ हजार ९५८ लोकसंख्या तर प्रभाग १२ बंगाली कॅम्पमध्ये असणार आहे. प्रभाग १३ एमईएलमध्ये १३ हजार २४३ लोकसंख्या प्रभाग १४ कामगार झोपडपट्टी, प्रभाग १५ अष्टभूजा, प्रभाग १६ महाकाली, प्रभाग १७ भानापेठ, प्रभाग १८ घुटकाळा, प्रभाग क्रमांक २० विठ्ठलमंदिर प्रभाग.
प्रभाग क्रमांक २१ पठाणपुरा, प्रभाग २२ भिवापूर, प्रभाग २३ गौरीतलाव, प्रभाग २४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग, प्रभाग २५ बाबूपेठ, प्रभाग २६ हिंदूस्थान लालपेठ मध्ये हिंदूस्थान लालपेठ, प्रसन्न पेट्रोल पंप ते बाबूपेठ रेल्वेस्टेशनपर्यंतचा परिसर समाविष्ट करण्यात आला आहे.



