
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत पुकारण्यात आलेला लॉकडाउन न वाढवण्याचे संकेत दिले आहेत. लॉकडाउनच्या काळातले निर्बंध सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले आहे. तसेच लॉकडाउन संपल्यानंतर आवश्यक धोरणे आखणे गरजेचे आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. लॉकडाउन संपल्यानंतर दहा मुख्य निर्णयांसह तयार रहा असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांना म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यानंतर त्यांनी हे संकेत दिले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला. हा लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत आहे. त्यामुळे त्यापुढे काय? लॉकडाउन आणखी वाढणार की संपणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. कारण लॉकडाउनमुळे अवघा देश ठप्प झाला आहे.



