चंद्रपूर, (का.प्र): 2 फेब्रुवारी : शहरातील प्रमुख महात्मा गांधी मार्गावर असलेल्या आझाद बागेत सकाळी फिरायला पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी मंगळवारी (दि.2) सकाळी आठ वाजेच्या सुमारास दुचाकीने आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढला. महिलेच्या फिर्यादीनुसार एक लाख रुपये किंमतीची सोनसाखळी चोरी केल्याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा चंद्रपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.शहरात चोरीचे हे प्रकार नित्यनेमाने सुरुच आहे. दररोज शहरात कोणत्यातरी एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाप्रकारचा गुन्हा दाखल होत आहे. दररोज प्रमाणे सकाळी फिरायला पायी जात असलेल्या फिर्यादी सुनीता सुधाकरराव गंपावार (69, रा. पठाणपुरा वार्ड, चंद्रपूर) यांच्या समोरुन मुख्य मार्गावर असलेल्या बैंक ऑफ इंडिया समोर दुचाकीने आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवरून पलायन केले. या दरम्यान श्रीमती गंपावार खाली पडले व त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत देखील झाली आहे.
Related Articles
मुंबई -पुणे येथून परतणाऱ्या नागरिकांनी शकुंतला लॉनवर प्राथमिक तपासणी करावी : मोहिते
Ø प्रत्येक तालुक्याला बसस्थानकावर व गावात आशा वर्कर मार्फत तपासणी Ø चंद्रपूरमध्ये आतापर्यंत 1 हजारावर नागरिकांची आरोग्य तपासणी चंद्रपूर, दि.18 मे : चंद्रपूर शहरात मुंबई-पुणे व अन्य शहरातून आगमन होत असलेल्या नागरिकांनी आपली सर्व प्रथम तपासणी व नोंद शकुंतला लॉन येथे करावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यात अन्य शहरात […]
म्युकरमायकॉसीस च्या चंद्रपूर जिल्हयातील रूग्णांसाठी खनिज विकास निधी अंतर्गत ५ लक्ष रू. पर्यंत खर्च जिल्हा प्रशासनाने उचलावा – आ. सुधीर मुनगंटीवार
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील सहा रूग्णालयात म्युकरमायकॉसीस या आजारावर उपचार करता येत नाही, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय तसेच सामान्य रूग्णालय येथे या आजारावरील उपचाराशी संबंधित यंत्रसामुग्री उपलब्ध नाहीत. अनेक रूग्ण खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. साधारणतः पाच ते साडेपाच लाख रूपये खर्च या आजारावरील उपचारासाठी येतो. हा खर्च सर्वसामान्य रूग्णांना परवडणारा […]


