चंद्रपूर, (का.प्र): 2 फेब्रुवारी : शहरातील प्रमुख महात्मा गांधी मार्गावर असलेल्या आझाद बागेत सकाळी फिरायला पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी मंगळवारी (दि.2) सकाळी आठ वाजेच्या सुमारास दुचाकीने आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढला. महिलेच्या फिर्यादीनुसार एक लाख रुपये किंमतीची सोनसाखळी चोरी केल्याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा चंद्रपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.शहरात चोरीचे हे प्रकार नित्यनेमाने सुरुच आहे. दररोज शहरात कोणत्यातरी एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाप्रकारचा गुन्हा दाखल होत आहे. दररोज प्रमाणे सकाळी फिरायला पायी जात असलेल्या फिर्यादी सुनीता सुधाकरराव गंपावार (69, रा. पठाणपुरा वार्ड, चंद्रपूर) यांच्या समोरुन मुख्य मार्गावर असलेल्या बैंक ऑफ इंडिया समोर दुचाकीने आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवरून पलायन केले. या दरम्यान श्रीमती गंपावार खाली पडले व त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत देखील झाली आहे.
Related Articles
केंद्राच्या विकासाभिमुख धोरणामुळेच कोळशाचे बंपर उत्पादन – हंसराज अहीर
आपल्या संबोधनात हंसराज अहीर यांनी सांगितले की, मा. प्रधानमंत्र्यांनी एम्पलायमेंट प्लेसमेंट आधारीत कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले असल्याने आज 75 भूमीपुत्रांना त्यांच्या हक्काचा रोजगार दिला जातोय 2015 पासून सर्व प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केल्याने नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. वेकोलि प्रकल्पग्रस्तांना 120 करोड ऐवजी 2,300 करोड आर्थिक मोबदला व प्रकल्पग्रस्तांना 11 हजार नोकऱ्या मिळाल्या आहेत. शेतकरी […]
ऍड. राहूल नार्वेकर यांच्या माध्यमातुन संसदीय प्रथा, परंपरा जपल्या जातील – आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार.
नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्षांना दिल्या शुभेच्छा !भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकशाहीच्या या मंदिरात अॅड. राहूल नार्वेकर यांच्यासारख्या कायदेतज्ञाची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली ही अतिशय आनंदाची बाब आहे. त्यांच्या माध्यमातुन या सार्वभौम सभागृहात संसदीय प्रथा, परंपरा जपल्या जातील, असा विश्वास माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभागृहात व्यक्त केला.दिनांक ३ जुलै रोजी विधानसभेत नवनिर्वाचित अध्यक्षांच्या अभिनंदनपर […]
द्रौपदी मुर्मु यांच्या विजय जल्लोषासाठी एकवटला आदिवासी समाज
भाजपा अनु.जमाती मोर्चाचे आयोजन ; तरुणाई सोबत आ.मुनगंटीवार थिरकले. भारतीय जनता पार्टीने नेहमी सेवेला महत्व दिले.समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी राजकारण केले.आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे ही भाजपाची संकल्पना आहे.त्यामुळेच भाजपाने विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या श्रीमती द्रौपदी मुर्मु यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली.त्या प्रचंड मतांनी विजयी झाल्या.त्यांचा विजय हा वीर बिरसा मुंडा यांच्या विचारांवर श्रद्धा […]



