चंद्रपुर

त्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील २३ जण व मुलगाही निगेटिव्ह

चंद्रपूर (का.प्र) संपूर्ण चंद्रपूर शहरात खळबळ माजवून देणाऱ्या त्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील २३ जणांचे त्याच्या व मुलाचे कोरोना तपासणी निकाल निगेटिव्ह आले आहेत. आज सकाळी त्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या पत्नीचे व मुलीचे सुद्धा कोरोना तपासणी निकाल हे निगेटिव्हच आले होते. ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपूर शहरात १ रुग्ण पॉसिटीव्ह असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे थोडेफार मनाला दिलासा देणारे हे वृत्त असले तरी पण नागरिकांना अजूनही सावधगिरीचा इशारा प्रशासनाने दिला आहे, कारण कोरोनाग्रस्त रुग्णाचा दुसरा निकाल अद्याप यायचा आहे. तो सात दिवसानंतर येणार असून तो पर्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे. वृत्त लिहेपर्यंत त्या रुग्णाला विशेष तपासणी करीता नागपूरला पाठविले आहे. तसेच आज कृष्णनगर येथील १४ जणांचे सॅम्पल पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.