राजुरा

रानडुक्कराच्या धडकेने एक ठार तर पाच गंभीर.

राजुरा (ता.प्र) :— राजूरा तालूक्यातील चनाखा मार्गावर मंगळवारला रात्री १२ च्या सूमारास रानडूकराने कारला दिलेल्या जबर धडकेत एकाच कुटूंबातील एक ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मोतीराम आत्राम असे मृतकाचे नाव आहे. अपघातानंतर सर्व जखमींना उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.
राजूरा तालूक्यात येणाऱ्या कविठपेठ येथिल मोतीराम विठू आत्राम हे आपल्या परिवारासह राजूरा येथिल रवि कोडापे या नातेवाईकाकडे गेले होते. मंगळवारला रात्री उशिरा रवि कोडापे यांच्या कारने आत्राम कुटूंबिय आपल्या गावाकडे निघाले . कार मध्ये मोतीराम आत्राम,साधना आत्राम,रुणाली आत्राम,समिक्षा आत्राम बसले होते. तर रवि कोडापे कार चालवित होते. या दरम्यान हा अपघात झाला आहे. घटनेची माहीती विरुर पोलीसांना देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळ गाठून जखमीना उपचारासाठी चंद्रपूरला हलविले. पुढील तपास विरुर पोलीस करित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *