चंद्रपूर दि.25 नोव्हेंबर : जिवती, कोरपना व गोंडपिपरी येथील नगरपंचायतीचे आरक्षण सोडत दि. 27 नोव्हेंबर 2020 रोजी निश्चित करण्यात येणार आहे. यासंबंधाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता दिली असून प्रभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करावयाचे आहे.जिवती नगरपंचायतीसाठी उपविभागीय अधिकारी रोहन घुघे, कोरपना नगरपंचायती साठी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जनार्धन लोंढे, तर गोंडपिपरी नगरपंचायतीसाठी उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) प्रियंका पवार-कर्डीले यांचे अध्यक्षतेखाली संबंधीत नगरपंचायत कार्यालयात दिनांक 27 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 12 वाजता सोडत पद्धतीने जागा निश्चित करण्यात येतील.तरी आरक्षण सोडतीच्या वेळी संबंधित नगरपंचायत क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
Related Articles
रेशनकार्ड नसलेल्या गरीब नागरिकांना धान्य उपलब्ध करण्यात यावे -आम.सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर (का.प्र.)-चंद्रपूर जिल्हयातील ज्या गरीब व गरजू नागरिकांकडे रेशनकार्ड उपलब्ध नाही अशा नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातुन धान्य उपलब्ध करण्यात यावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाèयांकडे केली आहे. यासाठी जिल्हा वार्षीक योजना किंवा खनिज विकास निधी अंतर्गत निधी उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी सुध्दा त्यांनी केली आहे.कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर केंद्र […]
बांबु म्हणजेच आधुनिक कल्पवृक्ष-वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार
नागपूर : विकासाचे प्रणेते, दुरदृष्टी असणारे लोकप्रिय नेते केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या प्रेरणेतून गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या अॅग्रोविजन या कार्यक्रमात महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थिती दर्शवुन मार्गदर्शन केले. बांबु उत्पादनातुन उत्पन्नाच्या संधी या सत्रात मार्गदर्शन करताना ना. मुनगंटीवार म्हणाले की मी लहानपणापासून अनेक झाडांबद्दल एैकत […]
*चंद्रपूर जिल्ह्यातील 3 शहरात सोमवारपासून लॉक डाऊन*
चंद्रपूर जिल्ह्यातील 3 शहरात सोमवारपासून लॉक डाऊन* *जिल्हयात आत्तापर्यंतची रुग्ण संख्या 1070* 670 बाधितांना आतापर्यंत मिळाली सुटी 390 बाधितावर रुग्णालयात उपचार सुरू 65 वर्षीय महिलेचा मृत्यू ; जिल्हयात 8 मृत्यू चंद्रपूर दि. १५ ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोमवारपासून घुग्घुस, गोंडपिंपरी व बल्लारपूर या तीन शहरांमध्ये लॉक डाऊन करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1070 बाधित पुढे […]



