चंद्रपूर दि.25 नोव्हेंबर : जिवती, कोरपना व गोंडपिपरी येथील नगरपंचायतीचे आरक्षण सोडत दि. 27 नोव्हेंबर 2020 रोजी निश्चित करण्यात येणार आहे. यासंबंधाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता दिली असून प्रभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करावयाचे आहे.जिवती नगरपंचायतीसाठी उपविभागीय अधिकारी रोहन घुघे, कोरपना नगरपंचायती साठी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जनार्धन लोंढे, तर गोंडपिपरी नगरपंचायतीसाठी उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) प्रियंका पवार-कर्डीले यांचे अध्यक्षतेखाली संबंधीत नगरपंचायत कार्यालयात दिनांक 27 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 12 वाजता सोडत पद्धतीने जागा निश्चित करण्यात येतील.तरी आरक्षण सोडतीच्या वेळी संबंधित नगरपंचायत क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
Related Articles
अखेर नरभक्षी वाघ जेरबंद, तब्बल नऊ महिन्यानंतर यश
राजुरा (जि. चंद्रपूर) ः मध्य चांदा वनविभागांतर्गत राजुरा आणि विरुर वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यास आज (दि. 27 ऑक्टोबर) वन विभागात यश आले. मागील दोन वर्षात दहा शेतकरी व शेतमजुरांचे बळी वाघाने घेतले होते. त्यामुळे या परिसरात प्रचंड दहशत होती. शेतकरी अतिशय आक्रमक झाले होते. अखेर आज दुपारच्या सुमारास राजुरा तालुक्यातील सिंधी गावालगतच्या […]
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 14 कोरोना पॉझिटिव्ह
* गत 24 तासात 4 कोरोनामुक्त * आतापर्यंत 22,468 जणांची कोरोनावर मात * ॲक्टीव पॉझिटिव्ह 159 चंद्रपूर, दि. 27 : जिल्ह्यात मागील 24 तासात 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 14 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहेजिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 15 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून […]
*जिल्ह्यातील आरोग्य सेवा अद्ययावत करा* : *संतोष सिंह रावत*
मुल – चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली असून शेतकरी, कामगार, महिला व बालकांना आरोग्य केंद्रात असुविधेचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात साधन व सुविधांची वाणवा आहे. वाढत्या नवनवीन आजारांच्या तुलनेत आरोग्य केंद्रे अद्ययावत नाहीत. तेव्हा जिल्हा प्रशासनाने ताबडतोब जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेवेची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी सर्व आरोग्य केंद्रात मूलभूत […]



