चंद्रपूर,दि.17 मे: जिल्ह्यामध्ये 13 मे रोजी आढळलेल्या दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर असून सध्या रुग्ण विलगीकरण कक्ष चंद्रपूर येथे भरती आहे. रुग्णाच्या अति जोखमीच्या संपर्कातील 7 जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर 2 मे रोजी कृष्ण नगर येथे आढळलेला रुग्ण सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे.जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तालुकास्तरावर 671 तर चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 174 असे एकूण 845 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तसेच 44 हजार 292 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे.तर 17 हजार 343 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.
Related Articles
शॉर्टसर्कीटमुळे लागली आग
मूल : चंद्रपूर मार्गावरील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाजवळील इलेक्ट्रीक डिपी वर शॉर्टसर्कीटमुळे अचानक लागलेली आग मूल नगर पालीकेच्या अग्नीशमन दलाचे वाहन पोहचुन विझविल्याने होणारा मोठा अनर्थ टळल्याने जवळपास असलेल्या व्यवसायीकांनी सुटकेचा श्वास सोडला.उन्हाची दाहकता वाढताच आगीचे सत्र सर्वत्र पाहायला मिळत असतानाच मूल येथील चंद्रपूर मार्गावरील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या बाजुला असलेल्या डिपीजवळ शॉर्ट सर्किट झाल्याने […]
चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३४९
२१४ कोरोनातून बरे ; १३५ वर उपचार सुरु चंद्रपूर दि. २४ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३४९ झाली आहे. काल रात्रीपासून सायंकाळपर्यंत उशिरा पुढे आलेल्या १३ बाधितांमध्ये मुल तालुक्यातील पाच, गडचांदूर तालुक्यातील एक, चंद्रपूर महानगर क्षेत्रातील दोन व चिमूर येथील चार बाधितांचा समावेश आहे. तसेच ब्रम्हपुरी येथील झीलगोडी येथील एका बाधिताचा समावेश आहे. त्यामुळे […]
जिल्ह्यात कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दि. 16 मे ते 31 मे 2023 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू केले आहे. या आदेशान्वये संबंधित अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा, मोर्चा, उत्सव व मिरवणुका काढता येणार नाही. पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी, […]


