चंद्रपूर (का. प्र.) . शहरातील पागल बाबा चौक येथे चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरु आहे यासाठी छत्तीसगड, मध्यप्रदेश, बिहारचे मजूर शेकडोच्या संख्येने कामावर होते.अशातच लॉकडाउन झाले आणि हे मजूर येथेच अडकले. या सर्व मजुरांची व्यवस्था करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची होती.मात्र त्याने या मजुराना वाऱ्यावर सोडत पळ काढला. काल मजुरांसाठी छत्तीसगड साठी ट्रेन धावली असल्याचे या मजुराच्या लक्षात आले. माजू शेकडोच्या संख्येने रस्त्यावर उतरले मात्र वेळीच पोलीस प्रशासन आणि तहसीलदार यांच्या मध्यस्थीने त्यांची समजूत काढण्यात आली. यावर तोडगा काढण्यासाठी मजुरांचे काही प्रतिनिधी आणि कंत्राटदाराना चर्चेसाठी रामनगर पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले.यात जो अंतिम तोडगा निघणार त्यानुसार मजूर निर्णय घेणार आहेत.
Related Articles
बल्लारपूर नगरपालिकेच्या कर विभागातील फेरफार प्रक्रिया सुरळीत करा:- राजु झोडे
फेरफार बाबतची किचकट प्रक्रिया थांबवून जनतेला नाहक त्रास देणे बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन वंचितचा इशारा बल्लारपूर:- बल्लारपूर नगरपालिकेच्या कर विभागाने सर्वसामान्यांना नाहक त्रास देण्यासाठी फेरफार करताना न्यायालयीन वारसान प्रमाणपत्र आणण्याचे सांगितले जात आहे. पूर्वी शपथपत्रावर फेरफार केल्या जात होते. परंतु आता नगरपालिकेने जाचक अट दिल्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. […]
मंगळवार पासुन होणार सहा दिवसीय श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाला सुरवात
आमदार किशोर जोरगेवार यांचे आयोजन, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सहा दिवसीय श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध २१ प्रकारचे खेळ खेळविले जाणार असुन उद्या मंगळवारी कल्याण- डोंबिवली लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी सात वाजता सदर क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला खासदार सुरेश उर्फ बाळु धानोरकर यांची विशेष अतिथी […]
चंद्रपूर शहरात 17 ते 20 पर्यंत लॉकडाऊन
लग्न व समारंभावर बंधने आणण्यात येणार;*जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांची माहिती* चंद्रपूर,दि.14 जुलै: शहरांमध्ये कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, येत्या 17 जुलै ते 20 जुलै या चार दिवसांच्या काळात पूर्णटाळेबंदी (लॉकडाऊन) केली जाणार आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंसह सर्वदुकाने बंद असतील.ही टाळेबंदी केवळ चंद्रपूर शहरासाठी मर्यादित असेल.त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातीत उर्वरित ग्रामीण भागातील नागरिकांनी 17ते 20 […]



