
शास्त्री नगर परिसरातील हिरेंद्र अपार्टमेंट मध्ये राहणारे निखिल पुराणिक हे दिनांक 24 मे 2023 रोजी नागपूरला मुक्कामी गेले असता दिनांक 26 मे रोजी मोलकरीण यांनी घराचा दरवाजा तोडून असल्याची माहिती फोनद्वारे कळवली त्यानंतर चंद्रपूर परत येऊन बघितले असता घरातील लोखंडी अलमारीचा दरवाजा तोडून त्यातील सोन्याचे दागिने व इतर वस्तू चोरी गेल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.गुप्त माहितीच्या आधारे सोनू दहिवडे वय 27 वर्ष, रा. आंबेडकर चौक, दुर्गापूर व श्रीकांत चुणारकर वय 20 वर्ष रा. महाकाली कॉलरी, चंद्रपूर या दोन आरोपींना रामनगर गुन्हे शोध पथकाने अटक केली गोपनिय माहिती वरून आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचेकडून गुन्हयात चोरीस गेलेले सोन्याचे दागीने जप्त केले यात एकूण 1,68,190/- चा माल जप्त करण्यात आला .सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकरी यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस पथक यांनी केली



