बल्लारपूर (ता. प्र ):कन्नमवार वार्ड मधील सुरज ठाकूर (३२) वर्षीय युवकाने आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली युवक सीसीटीव्ही इंस्टॉलेशन चा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याचे दोन मोठे भाऊ गुजरात व मध्यप्रदेशात वास्तव्यास आहे. आत्महत्ये मागचे कारण अद्याप स्पष्ठ होऊ शकलेले नाही. बल्लारपूर पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहे.



