*धक्कादायक ! कोरोनामुळे 30 वर्षीय तरूणाचा मृत्यू*
*नवीन 44 बाधित* *55 कोरोनामुक्त*
गडचिरोली(प्रति): गडचिरोलीत एकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी जिल्हयात वेगवेगळया तालुक्यातील 55 जण कोरोनामुक्त झाले.तर नवीन 44 बाधितांमध्ये गडचिरोली 13, अहेरी 6, आरमोरी 9, चामोर्शी 7, कोरची 3, कुरखेडा 2 व वडसा 3 जणांचा समावेश आहे. चामोर्शी तालुक्यातील घोट येथील 30 वर्षीय तरूणाचा कोरोनामूळे मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.आजच्या नवीन 44 कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली 13 यात नवेगाव 3, सर्वोदया वार्ड 2, कॅम्प एरिया 2, आशिर्वादनगर 1, कारगिल चौक 1, मार्काबेादी 1, आयोध्यानगर 2, चामोर्शी रस्ता 2 रूग्णांचा समावेश आहे. अहेरी 6 यात शहरातील 4 तर महागाव व आलापल्ली एक-एक, आरमोरी 9 यात शहरातील 8 तर सायगाव 1. चामोर्शी 7 यात वाघधरा 3, शहर 3 आणि रेखेगाव 1. कोरची 3, कुरखेडामधील 2 यात शहर 1 व चारबत्ती 1. वडसामधील 3 मध्ये विसोरा 1, शिवाजी वार्ड 1 हनुमान नगर 1 यांचा समावेश आहे.



