चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

खड्यात बसून प्रशासनाचा विरोध, म्हातारदेवी मार्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

घुग्घूस (चंद्रपूर) : घुग्घूस-म्हातारदेवी मार्गावर शेकडो खड्डे पडले आहे. या खड्यांनी अपघाताची संख्या वाढविली. समाजमाध्यमात चिमटे घेणारे मिम्स व्हायरल करीत शहरवाशीयांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अश्यात मोमिन शेख, अफ़ज़ल सिद्दीकी, राईस शेख, राजू शेख, सलमान खान, बबलू शेख, अक्षय अध्ये या तरूणांनी थेट खड्यात खुर्च्या टाकून बसले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तरूणांनी केलेल्या या कृतीची चर्चा शहरात रंगली आहे.

जिल्ह्यात उद्योगनगरी म्हणजे ओळखल्या जाणाऱ्या घुग्घुस – म्हातारदेवी रस्त्यावर स्थानिक नागरिकांची ये-जा करणे कठीण झाले आहे. या रस्त्यावरील खड्डे आम्हीच बुजवले आहेत. अशी बोंब ठोकली होती. प्रत्यक्षात मात्र या रस्त्याची अवस्था जैसे थे आहे. घुग्घुस – म्हातारदेवी रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ असते, त्यामुळे या रस्त्यावर सुमारे 2 फूट खोल आणि 3 ते 5 मीटर पसरलेल्या खड्ड्यांतून अनेक प्रवासी रस्त्यावर पडून जखमी झाले.

खड्डे याकडे स्थानिक प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती रोष आहे. अश्यात आता समाजमाध्यमातून चिमटे घेणे सूरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *