
चंद्रपूर (का.प्र ) सध्या संपूर्ण जग हे कोरोनाच्या दहशहती खाली जगत असून आपल्या देशातही केंद्र शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मे पर्यंत लॉकडाऊन केले आहे. अति आवश्यक असेल तर बाहेर निघा अन्यथा घरात राहा सुरक्षित राहा असे वारंवार सांगण्यात येत आहे. मास्क न लावण्याऱ्या नागरिकांकडून दंडही आकारला जात आहे. तरी सुद्धा नागरिक ऐकायला तयार नाही. आज सोमवार दि. २७/०४/२०२० रोजी जटपूरा गेट परिसरात जवळ पास पन्नास पेक्षा अधिक पोलिसांकडून गाड्यांची तपासणी सुरु होती. स्वतः हा जिल्हा पोलीस अधिक्षक उपस्थित होते. या वेळी तपासणी दरम्यान जटपुरा गेट येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे मोठी गर्दी झ्याल्याची आढळून आले. या दरम्यान मोठ्या प्रामाण्यात दंड वसूल केल्या गेला.



