
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात महत्वपूर्ण घोषणा केली आहे. नागपुरातून लवकरच काही महत्वाच्या शहरापर्यंत 140 किलोमीटर ताशी वेगाने ब्रॉडगेज मेट्रो धावणार आहे, या प्रकल्पाला रेल्वे बोर्डाची देखील मंजुरी मिळाल्याचं गडकरी म्हणाले आहेत.
नागपूर ते गोंदिया, नागपूर ते वडसा, नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते अमरावती अकोला, नागपूर ते बैतुल नागपूर ते छिंदवाडा आणि नागपूर ते रामटेक या मार्गावर 140 किलोमीटर प्रति तासाने ब्रॉडगेज मेट्रो चालावी हे आमचं स्वप्न होत, गडकरी पुढे म्हणाले की, रेल्वे बोर्डाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. पुढच्या आठवड्यात दिल्लीला मेट्रो आणि रेल्वेमध्ये करारावर स्वाक्षरी होणार आहे आणि लवकरच हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे अशी माहिती ही त्यांनी दिली.




