चंद्रपुर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात एक धक्कादायक घटना घडली असून बँकेचा निधी जमा करणाऱ्या आर डी एजन्ट वर पाळत ठेवून असलेल्या 2 व्यक्तींनी दुचाकीने येत आर डी एजन्ट च्या डोळ्यांत मिर्ची पावडर टाकत त्यांच्या जवळील 1 लाख 63 हजार रुपयाची लुट केल्याची घटना 25 एप्रिल ला सकाळी 10:00 च्या दरम्यान घडल्याची माहिती विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे या संदर्भातील अधिक माहितीनुसार ब्रम्हपूरी शहरातील श्री संजय देवाजी कुळसंगे हें सेंट्रल बँक व आयसिआयसिआय बँकेचे एजन्ट असुन शहरातील लहान-मोठ्या व्यावसायिका कडुन रक्क्म जमा करत असतांना शहरातील एका पेट्रोल पम्प जवळ 2 अज्ञात व्यक्ती दुचाकीं वरून आलेत व त्यानी कुळसंगे यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकत त्यांच्या जवळ असलेले 1 लाख 63 हजार रु रक्कम घेऊन पसार झाले या बाबत कुळसंगे यांनी ब्रम्हपूरी पोलिसात तक्रार दाखल केली असुन पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.
Related Articles
डॉक्टरांच्या सहभागातून जनतेसाठी आरोग्याचे सेवा प्रकल्प उभारणार -डॉ. शरद अग्रवाल
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अग्रवाल यांची इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर ला भेट चंद्रपूर-इंडियन मेडिकल असोसीएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद अग्रवाल यांनी आपल्या चमूसह चंद्रपूर शहराला भेट दिली.त्यांच्या चमू मध्ये आयएमए चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.जयेश लेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.रविंद्र कुटे,अध्यक्ष अकशन कमिटी डॉ.अनिल पाचनेकर, डॉ.संतोष कदम सचिव आयएमए महाराष्ट्र यांचा समावेश […]
चंद्रपूर व वरोऱ्यात कांग्रेसचे सत्याग्रह आंदोलन
चंद्रपूर : लोकशाहीप्रधान देशात सत्ताधारी आणि विरोधक यांना तेवढेच महत्वाचे स्थान आहे. परंतु, देशात सध्या सत्तेत असलेल्या मोदी सरकारला विरोधी पक्षांचे अस्तित्व मान्य नाही. यातून विरोधी पक्षातील नेत्यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. त्यासाठी मोदी सरकार केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केला. काँग्रेसच्या […]
कोरपना येथे ठाकरे सरकार विरोधात जाहीर निषेध आंदोलन व पुतळा दहन कार्यक्रम…
महविकास आघाडी सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात- नारायण हिवरकर ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत बुलंद आवाज उठवणाऱ्या बारा आमदारांना निलंबित करून महाराष्ट्र लोकशाहीची हत्या केली आहे. महाराष्ट्र सरकारचे हे धोरण दडपशाहीचे असून केवळ दोनच दिवसाचे अधिवेशन बोलावण्यात आले त्यातही विरोधकांना बोलू न देणे हे हुकुमशाही चे धोरण असून हा लोकशाहीचा अपमान आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो. […]



