चंद्रपुर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात एक धक्कादायक घटना घडली असून बँकेचा निधी जमा करणाऱ्या आर डी एजन्ट वर पाळत ठेवून असलेल्या 2 व्यक्तींनी दुचाकीने येत आर डी एजन्ट च्या डोळ्यांत मिर्ची पावडर टाकत त्यांच्या जवळील 1 लाख 63 हजार रुपयाची लुट केल्याची घटना 25 एप्रिल ला सकाळी 10:00 च्या दरम्यान घडल्याची माहिती विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे या संदर्भातील अधिक माहितीनुसार ब्रम्हपूरी शहरातील श्री संजय देवाजी कुळसंगे हें सेंट्रल बँक व आयसिआयसिआय बँकेचे एजन्ट असुन शहरातील लहान-मोठ्या व्यावसायिका कडुन रक्क्म जमा करत असतांना शहरातील एका पेट्रोल पम्प जवळ 2 अज्ञात व्यक्ती दुचाकीं वरून आलेत व त्यानी कुळसंगे यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकत त्यांच्या जवळ असलेले 1 लाख 63 हजार रु रक्कम घेऊन पसार झाले या बाबत कुळसंगे यांनी ब्रम्हपूरी पोलिसात तक्रार दाखल केली असुन पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.
Related Articles
माता महाकाली महोत्सव जिल्हाचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतीक महत्व राज्यात पोहचवेल – आ. किशोर जोरगेवार
चंद्रपूर जिल्हाला धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतीकरित्या मोठे महत्व आहे. गोंड राजाच्या या जिल्हात गोंड कालीन शिल्पकलेचा नमुना दर्शविणारे अनेक वास्तु आहे. राज्यभरात मोठ्या संख्येने भक्त असलेली चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली येथे विराजमान आहे. जिल्हाला धार्मिक पंरपरा लाभली आहे. मोठ मोठ्या सामाजिक चळवळ या जिल्हात उभ्या राहिल्या आहे. चंद्रपूरचा हाच गौरवशाली इतिहास आणि पर्यायाने जिल्हाचे धार्मिक, सामाजिक […]
हंसराज अहीर यांच्या निवासस्थानी जिवती तालुक्यातील शेकडो युवकांचा भाजप प्रवेश
चंद्रपूर- जिवती तालुक्यामधील अनेक गावातील विविध पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या निवासस्थानी भाजपामध्ये प्रवेश केला. या सर्व नवप्रवेशित कार्यकर्त्यांचा हंसराज अहीर यांनी पक्षाचा दुपट्टा घालुन सन्मान केला. दि. 25 सप्टे रोजी पार पडलेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास पक्षाचे चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे विस्तारक खुशाल बोंडे, माजी महापौर […]
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिबीर
*वरोरा, चिमुर,ब्रम्हपुरी व गडचांदूर येथील नागरिकांनी लाभ घ्यावा चंद्रपूर, दि. 18 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी व गडचांदूर या तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्क्या अनुज्ञप्ती, खाजगी संवर्गातील वाहनाची नोंदणी इत्यादी कामांकरिता माहे नोंव्हेंबर महिन्यातील एक दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.परिवहन विभागाच्या कार्यक्रमानुसार आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथे दिनांक 24 नोव्हेंबर, शासकीय विश्रामगृह, […]


