चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

असत्यावर सत्याचा विजय म्हणजे दसरा – खास. बाळू धानोरकर

– कुठल्याही जाती-धर्माच्या आणि समाजावर बोट न दाखवता माणसात असलेले अवगुण, वाईट गुण दूर सारून असत्यावर सत्याचा विजय म्हणजे दसरा होय, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

सार्वजनिक राष्ट्रीय शारदा महोत्सव मंडळ येथे आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी महापौर संगीता अमृतकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, प्राध्यापक शाम धोपटे, यांची उपस्थिती होती.

राष्ट्रीय सार्वजनिक शारदा महोत्सवाच्या माध्यमातून 1957 पासून दरवर्षी रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे, त्याची परंपरा आजही जोपासण्यात आली. माणसातील वाईट अवगुण दूर करण्यासाठी दसरा सण साजरा व्हावा अशी अपेक्षा खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published.